पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मधुरा

प्रिय मधुरास आज तुझा चाळीसावा वाढदिवस तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! इतकी वर्षे कशी निघून गेली कळलेच नाही. पल्लवी नंतर तीन वर्षांनी तू झालीस खूप सुंदर आणि हेल्दी होतीस तुला पाहून सगळे खूप खुश होते खूप शांत आणि हसरी होतीस पल्लवीच्या मागे मागे राहत असे कधी हट्टीपणा करून त्रास दिला नाहीस लहानपणी तुला फारसे बाहेर जाऊन मैत्रिणीबरोबर खेळणे आवडत नसे घरातच रमत असे मात्र बाल जगत जॉईन केल्यावर चांगली ऍक्टिव्ह झालीस शाळेत पण गॅदरिंग मध्ये उत्साहाने भाग घेत असे सगळ्या डान्स मध्ये तू असायचीस. सायकलिंग आणि मैत्रिणीबरोबर खेळणे सुरू झाले आठवी नववी नंतर मात्र तू अभ्यासात स्वतःला खूप गुंतवून घेतले दहावीला मेरीट येऊन आम्हा सगळ्यांना सुखद धक्का दिला बारावीत देखील पहिली मेरीट आलीस तो क्षण आम्हा सगळ्यांसाठी आनंदाचा होता तुझा रिझल्ट ऐकल्यावर पल्लवी तर आनंदाने रडायलाच लागली त्यामागे तुझे अपरिमित कष्ट आणि मनावरील संयम या दोन गोष्टी होत्या तुझ्या कष्टाचे तुला योग्य फळ मिळाले याचा मला आनंद आहे मोठी आई ला तुझे फारच कौतुक होते सगळे मामा लोक तुझ्या रिझल्ट नंतर ऑफिस प्रेस ला सुट्टी देऊन आपल्या घरी येऊन बसले होते स...