मधुरा
प्रिय मधुरास
आज तुझा चाळीसावा वाढदिवस तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! इतकी वर्षे कशी निघून गेली कळलेच नाही. पल्लवी नंतर तीन वर्षांनी तू झालीस खूप सुंदर आणि हेल्दी होतीस तुला पाहून सगळे खूप खुश होते खूप शांत आणि हसरी होतीस पल्लवीच्या मागे मागे राहत असे कधी हट्टीपणा करून त्रास दिला नाहीस लहानपणी तुला फारसे बाहेर जाऊन मैत्रिणीबरोबर खेळणे आवडत नसे घरातच रमत असे मात्र बाल जगत जॉईन केल्यावर चांगली ऍक्टिव्ह झालीस शाळेत पण गॅदरिंग मध्ये उत्साहाने भाग घेत असे सगळ्या डान्स मध्ये तू असायचीस. सायकलिंग आणि मैत्रिणीबरोबर खेळणे सुरू झाले
आठवी नववी नंतर मात्र तू अभ्यासात स्वतःला खूप गुंतवून घेतले दहावीला मेरीट येऊन आम्हा सगळ्यांना सुखद धक्का दिला बारावीत देखील पहिली मेरीट आलीस तो क्षण आम्हा सगळ्यांसाठी आनंदाचा होता तुझा रिझल्ट ऐकल्यावर पल्लवी तर आनंदाने रडायलाच लागली त्यामागे तुझे अपरिमित कष्ट आणि मनावरील संयम या दोन गोष्टी होत्या तुझ्या कष्टाचे तुला योग्य फळ मिळाले याचा मला आनंद आहे मोठी आई ला तुझे फारच कौतुक होते सगळे मामा लोक तुझ्या रिझल्ट नंतर ऑफिस प्रेस ला सुट्टी देऊन आपल्या घरी येऊन बसले होते सगळेच खुश होते बोर्डाचे चेअरमन पालक मंत्री आपल्या घरी येऊन तुझा सन्मान करून घेणे आम्हाला तुझा खूपच अभिमान वाटला त्यानंतर अनेक ठिकाणी तुझे सत्कार व्हायचे तू स्टेजवरून माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांना देते असे ऐकले की माझ्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागत आणि स्टेज वरील तू मला दिसेनाशी होई अभिमानाने मन भरून येईल तू आम्हा सगळ्यांना खूप आनंद दिलास असो त्यानंतरही तू उत्तम रित्या सीएची डिग्री मिळवली नोकरीही केली लग्नानंतर मुंबईत स्थिरावली आता नोकरी मध्येही अगदी समर्पित होऊन कष्ट करतेस आणि महत्त्वाचे स्थान मिळवलेस इतके डेडिकेशन क्वचितच पाहायला मिळेल मला त्यांचे कौतुकच आहे पण या सगळ्यात तू स्वतःच्या तब्येतीची फार हेळसांड करतेस याचा मला फार गेला जिल्हा मला त्रास होतो तू आर्याची ही इतक्या काळजीने संगोपन करतेस तिच्या अभ्यासाकडे आणि इतर ऍक्टिव्हिटीज कडे खूप लक्ष देतेस आमची पण तुला खूप काळजी असते रोज सकाळी संध्याकाळी फोन करून आमची खुशाली विचारत असते याचे आम्हाला कौतुकच आहे श्रीकांत चे पण तुला) फार प्रेम आहे तो विद्यार्थी असताना मुंबईत नवीन होता तेव्हा तू त्याची आई प्रमाणे काळजी घेतलीस त्यामुळे आम्ही त्रिची ला निश्चिंत होतो तू आणि केदार त्याचे पालक होता. पल्लवी शी तुझे मैत्रिणी प्रमाणे नाते आहे तुम्हा भावंडांचे एकमेकांवर असेच प्रेम राहो आता तर तू चांगली लेखिका झालिस अनेक ब्लॉग लेख कविता लिहितेस इंग्लिश प्रमाणे मराठीत देखील उत्तम लिखाण करतेस अनेक लोकांना तुझे लिखाण आवडते तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही ठाकूर चरणी माझी प्रार्थना आहे. तू फार भावनाप्रधान आहेस छोटीशी गोष्ट मनाला लावून घेतेस स्वतःला त्रास करुन घेतेस आता चाळीसावा वाढदिवसानिमित्त स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देण्याचा संकल्प तू करावास आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवावे अशी माझी इच्छा आहे पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत पूर्ण करते
स्मिता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा