kishori
सोलमेट हा शब्द मी माझ्या मुलीकडून तिच्या मैत्रिणीच्या संदर्भात तिने वापरला होता तो मला प्रचंड आवडला खरंच आहे आयुष्याच्या वळणावर सुरुवातीला किंवा उशिरा जरी कोणी आपले भेटले तरी ते आपले सोलमेट असू शकतात. हे आपल्या आयुष्यात मोजकेच असतात मग ते नातेवाईक किंवा मित्र कुठल्याही रुपात असू शकतात. सहा-सात वर्षापूर्वी मी सकाळी ज्या बगिच्यात मॉर्निंग वॉकला जात असे तेथे चाळीस-बेचाळीस वर्षाची स्त्री मला नवीनच फिरायला दिसू लागली उंच गोरी सुस्वरूप पण तिला काही शारीरिक त्रास असल्याचे जाणवले. का कोण जाणे मला ती पाहताच आवडली आणि तिच्याशी बोलावेसे वाटले एकदा दोघीही बाकावर बसले असताना मी संभाषण सुरू केले तेव्हा तिचे नाव किशोरी असल्याचे समजले. ती जवळच राहत होती तिला पाठीचे दुखणे असल्याने तिने फिरणे सुरू केले होते शांत स्वभावाची मृदुभाषी किशोरी माझ्यापेक्षा जवळपास दहा वर्षांनी लहान होती हळूहळू आम्ही भेटायला लागलो रोज थोडावेळ बसून गप्पा सुरु झाल्या. एखाद्या दिवशी भेट न झाल्यास चुकल्या सारखे वाटू लागले. आमच्या मैत्रीची छान सुरुवात झाली. तिने चिकाटीने नियमितपणे जिम जॉईन करून आणि नेमाने फिरणे यामुळे तिच्या द...