स्पर्श
काल फेसबूक वरील एक रील पाहिले. त्यात नायिका जी वेश्या असते तिच्या प्रियकराला, फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवायला आणि थोपटायला सांगते. तो तिला थोपटत असताना, तिच्या चेहऱ्यावरचे भाव इतके बोलके होते, त्यात इतक्या वेदनादायक प्रवासाला स्वीकारून ती इथपर्यंत आली याचे आपल्याला त्यात स्पष्ट दर्शन घडते आणि त्या आश्वासक वासनारहित स्पर्शाने तिच्या तनामनाला जो स्पर्श केलाय त्याचा निखळ आनंद तिच्या चेहऱ्यावर आपल्याला स्पष्ट दिसतो. त्यातच ती आपल्या डोळ्यातून वाहणारे पाणी निग्रहाने थांबवते. हे सर्व त्या एक मिनिटात सिन मध्ये त्या अभिनेत्रीने जिवंत केले. हे सर्व बघताना माझ्या डोळ्यात पाणी आले. मी विचार करू लागले. खरंच स्पर्शाची जादू फार मोठी आहे. एक वाचलेला प्रसंग आठवला, म्हाताऱ्या आईला भेटायला अनेक वर्षांनी तिची मुलगी आली तिने आईला मिठी मारली तर ती म्हातारी बाई रडू लागली. कारण विचारल्यावर आई म्हणाली किती तरी वर्षात मला कुणी स्पर्श केला नाही त्या मुळे आज खूप भरून आले. खूप आनंद वाटला त्या जर्जर देहाला ती प्रेमपूर्ण मिठी आनंद देऊन गेली. खरेच आहे आज दोन प्रेमाचे शब्द, एक ...