पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुभव

आई जाऊन जवळपास सात वर्षे झाली त्यापूर्वी मी बहुतेक वेळा एक-दोन दिवसाआड आईकडे जायचे दिवसभर किंवा तीन चार तास तिच्यासोबत राहून संध्याकाळी परत यायचं पण तिचा सहवास खूप छान मिळायचा मला नेहमी आश्चर्य वाटायचे की रोजच मी तिला भेटते पण मला पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरायचा मला गंमतच वाटायची पण आज त्याचा अर्थ काढतो आम्ही आता दोघेच असतो कोणी आलं तर किती आनंद होतो खूप बरे वाटते मुलांचे येणे हळूहळू कमी झाले त्यांचे व्याप वाढलेत वय वाढल्यावर आपल्या माणसांना पाहून किती आनंद होतो हे ज्याचे त्याने अनुभवावे असो घरी येताना आई यांच्यासाठी काही फराळ द्यायची कधी लोणचे कधी लाडू कधी पराठे जे असेल ते प्रेमाने भरून द्यायची त्याचा मलाही खूप आनंद होता खूप छान दिवस होते ते आज मी शोभा कडे गेले होते शोभा खूप दिवसानंतर येथे आली पूर्वी मी नेहमीच तिच्याकडे जात असे ती पण येत असे पण मध्यंतरी ती दोन वर्ष बंगलोरला होती आता ती आली तिच्या मुली तिला सोबत करतातच परवा मेघा येणार होती म्हणून आज तिने मला जेवायला आणि गप्पा करायला बोलावले आमची 32 - 34 वर्षांची मैत्री आहे आम्ही बिंदासपणे एकमेकांशी सगळ्या गोष्टी बोलू शकतो प...