सोनेरी आठवणी
सोनेरी आठवणी असं म्हणतात वयाची साठी उलटली की भूतकाळातील घटना लख्खपणे आठवायला लागतात माझ्या बाबतीत हे खरेच घडलेले आहे इतकी वर्ष न आठवलेल्या गोष्टी मला काल घडल्याप्रमाणे स्पष्टपणे आठवायला लागल्यात मलाच त्याचे आश्चर्य वाटते किंवा मधली काही वर्ष आपण संसारात मुलांच्या शिक्षणात लग्नांमध्ये बिझी होतो त्यामुळे विचार करायला वेळच नसे हे कारण असू शकते. आता रिकाम पण आलेले आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी लग्न होऊन मी त्रिचीला गेले तेव्हा दक्षिणेकडील मोठमोठी मंदिरे पाहून अवाकच झाले होते . त्रीचीच्या आसपास बरीच प्रचंड मोठी आणि देखणी मंदिरे आहेत. माझी आई भावंडे, मोठे दीर जाऊ बाई यांना सगळ्यांना दाखवून झाली त्यांना देखील ती फार आवडली. त्यावर तीस वर्षे उलटली आम्ही बडोदा नागपूर असे सर्व करून पुन्हा त्रिचित दाखल झालो यावेळेस नोकरी बदलली होती त्यामुळे मोठे घर ते पण गावात गाडी ड्रायव्हर अशी सर्व सोय होती. माझ्याजवळ निवांत वेळ पण होता हे सकाळी आठला जाऊन संध्याकाळी घरी येत. आता जुन्या मैत्रिणी पैकी फक्त आम्रपाली तेथे होती ती पण 25 किलोमीटर वरील टाऊनशिप मध्ये राहत होती त्यामुळे आठ दहा दिवसातून एकदा भेट होई. मी वेळ घा...