पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सीमा

इमेज
सीमा  आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीविषयी लिहायचे म्हणजे काय लिहावे हा मोठा प्रश्न पडतो. सीमा विषयी लिहायचे म्हणजे तिची विविध रूपे मला दिसू लागली. आई दादांची लाडकी सीमा, शेखर आणि माझी प्रिय बहीण, राजू संजू ची प्रेमळ अक्का, माझ्या मुलींची लाडकी मावशी, विनोद ची प्रिय पत्नी, सासुरवाडी ची कर्तबगार मोठी सून, तर पियू प्राजु आणि सायली ची मैत्रिणी सारखी खंबीर आई. खूप सार्‍या मैत्रिणींची प्रिय सखी आणि आता नातवंडांशी आवडती आऊ, बघता बघता घरातली छोटी सीमा एवढी मोठी कधी झाली हे कळलेच नाही. लहानपणी लहान म्हणून ती आई दादांची फार लाडकी होती. दादा तिला विचारायचे सीमा ताईचा पहिला नंबर आलाय तुझा कितवा येणार आहे. तर मिश्किलपणे हसून म्हणायची दादा हाताची सगळी बोटे सारखी नसतात ना, सगळे हुशार असले पाहिजे असे नाही ना. दादांनी तिला कॉलेजमध्ये जायला पहिली लुना घेऊन दिली. ती सीमा, दादांच्या अचानक जाण्याने अवघी सतरा वर्षाची असतांना आई शेखर राजू संजू चा आधार झाली. तिने आईला खूप चांगली साथ दिली. सगळ्या घराला चांगले सांभाळून घेतले. संजू राजू वर कडकपणे लक्ष ठेवले, त्यांना वेळोवेळी अभ्यासासाठी...

Sarita

इमेज
सरिता अगं किती या ऱ्हस्व-दीर्घ च्या चुका साधं शुद्ध मराठी पण नीट लिहिता येत नाही असा म्हणून मॅडमने फेकून दिलेला पेपर उचलताना तिच्या डोळ्यात अश्रू आलेत पण ते तिने निकराने परतवले आणि स्वतःला सावरले.  चोवीस पंचवीस वर्षाची ती स्वतःच्या मूकबधिर मुली साठी नागपूर हुन आपल्या दोन छोट्या मुलांना सासूबाईंच्या हवाली करून पुण्याला एक वर्षाच्या ट्रेनिंग कोर्ससाठी आली होती तिचे शिक्षण नांदेड जवळील छोट्याशा गावात झाले होते आंध्रा जवळच्या छोट्याशा गावातील शाळेत मराठी यथातथाच शिकविल्या गेले होते. मॅट्रिक नंतर लगेच लग्न झाले. मुलीच्या भविष्यासाठी उपयोगी पडेल म्हणून हा कोर्स करण्यासाठी ती पुण्याला आली होती दर महिन्यात नागपूरला मुलांना भेटण्यास जात होती तिच्या यजमानांचा आणि घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता पण तिची शारीरिक आणि मानसिक दमछाक होत होती. स्वभावाने ती कष्टाळू आणि जिद्द असल्याने चांगला अभ्यास करून तिने अखेर जिंकले त्यावर्षी फायनल मध्ये टॉप केले. परत येऊन मूकबधिर शाळेत 28 वर्षे नोकरी केली मुलीला मात्र नॉर्मल शाळेत पाठवून तिचा अभ्यास घेऊन तिला शिकविले आणि जगात वावरण्यासाठी समर्थ बनविले ...

स्पर्श

स्पर्श        देवाने स्त्रीला एक संवेदनक्षम मन तर दिले आहे त्याचबरोबर स्पर्शाची भाषा कळण्याचा एक अनोखा मंत्र पण दिला आहे. परवा दुपारी घरी एकटीच होते तेव्हा टीव्हीला मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा पहात होते. त्यात नायकाची प्रेयसी जी डॉक्टर असते तिच्या तरुण पेशंटला जेव्हा सांगते की तुला पोटाचा कॅन्सर झाला आहे तेव्हा तो दुःखाने आणि उद्वेगाने चिडून तेथून निघून जातो हे पाहिल्यावर नायक तिला म्हणतो तू त्याला जादूची झप्पी द्यायला हवी होती ना! त्याला बरे वाटले असते जादूची झप्पी म्हणजे त्याला जवळ घेऊन मिठी मारायची आणि स्पर्शातून सांगायचं की मी तुझ्या दुःखात सहभागी आहे. स्पर्शात फार मोठी ताकद असते हे पाहिल्यावर मला भरून आले. मला आठवते मी दहा-बारा वर्षाची असेल आमची परिस्थिती सुखवस्तू होती आईचे एक चुलत बंधू होते त्यांची परिस्थिती बेताची होती आईवर त्यांची फार माया होती. त्यांचे ते सारवलेले घर अंगणातील पेरू सिताफळ डाळिंबाची झाडे पिंजऱ्यातील पोपट, विहीर यांचे आम्हाला फार आकर्षण होते आई बरोबर आम्ही त्यांच्याकडे जात असू. असेच एकदा गेल्यावर आई मामा मामीच्या गप्पा झाल्या खाणे पिणे आणि आमच...