पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दादा - बाळासाहेब पाचपोर

इमेज
प्रिय दादांना सादर प्रणाम कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला  वैभवाने ड वरून आला याल का हो बघण्याला तीर्थरूप दादांची आठवण झाली की याच ओळी माझ्या ओठावर येतात आज तुमचा स्मरण दिवस! तुम्ही जाऊन 42 वर्षे होऊन गेलीत तुम्ही अकस्मात पणे आमच्या आयुष्यातून निघून गेलात पण तुम्हाला विसरणे अशक्यच होते. मी तर असे म्हणेन की आई आणि आम्ही भावंडे यांनी तुम्हाला आमच्या मनात आज इतकी वर्ष जिवंत ठेवले, तुमच्या अनेक आनंदी स्मृती आम्ही आमच्या आयुष्यात जाग्या ठेवल्या अवघ्या 49 वर्षाच्या आयुष्यात तुम्ही आमच्यासाठी आपल्या भावंडांसाठी आणि सर्वपरिचितांसाठी इतके केले की त्याला गणतीच नाही. आजही जुने कोणी भेटले की तुमचे कौतुकच करतात मला आठवते मी माटरगावी आजोळी जायचे तर कप्तान साहेबांची लेक आली आहे असे आदराने आणि प्रेमाने सर्व लोक बोलत आपल्या गावातील मुलगा पोलीस इन्स्पेक्टर झाला याचे सर्वांनाच कौतुक होते घरच्या आर्थिक अडचणींमुळे तुम्ही मामांकडे आणि आक्का आत्याकडे राहून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले हुशार असूनही पुढचे शिक्षण न घेता सागर येथे पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये भरती झालात आणि नोकरीला लागला. घरा...

राजीव

कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला वैभवाने बहरून आला याल का हो बघण्याला हे गाणे जेव्हा मी ऐकते तेव्हा माझ्या दोन प्रिय व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येतात. एक माझे वडील त्यांना मी दादा म्हणायचे आणि दुसरे म्हणजे माझे पती राजीव अभ्यंकर. आमचे दोघांचेही वडील पोलीस डिपार्टमेंट ला नोकरीला होते त्यामुळे परिचित होते त्यातूनच योगायोगाने आमचे लग्न ठरले मी फायनल ला असताना झालेसुद्धा, नंतर मी येऊन परीक्षा दिली आणि ग्रॅज्युएट झाले. आमच्या लग्नाला जवळपास त्रेचाळीस वर्षे झाली मी मागे वळून बघते तर यांची अनेक रूपे मला दिसतात वयाच्या 24व्या वर्षी आम्ही लग्न होऊन तमिळनाडूतील त्रिची येथे गेलो हे मितभाषी होते पण यांनी माझी खूप काळजी घेतली मला आणि मुलींना घेऊन केलेले असंख्य प्रवास आठवतात. अनेकदा कठीण प्रसंग आले पदरी फारसा पैसाही नसायचा तरीही मी कधी यांना घाबरलेले किंवा डगमगले ले पाहिल्याचे मला आठवत नाही नेहमी शांत डोक्याने निर्णय घेऊन त्यावर ठाम राहिले प्रसंगी कधी निर्णय चुकला तरी त्यातून योग्य तो मार्ग काढला कधी कोणाच्या मदतीची अपेक्षा केली नाही स्वतःच्या कर्तबगारीने आम्हाला अत्यंत चांगल्या परिस्थितीत नेहम...

आई

प्रिय आईस आज तुझा स्मरण दिवस तू आम्हाला सोडून जाण्याला सहा वर्षे झालीत यावर विश्वासच बसत नाही आपली इतकी जिवाभावाची व्यक्ती काळाने आपल्यापासून कायमची हिरावून घेतली तरी आपण मात्र विरहाच्या दुःखाला काळ हेच औषध आहे असे म्हणत असतो. मला वाटते हे खरे नाही एक क्षण असा येतो की ती जखम पुन्हा जिवंत होऊन तितकीच यातना देऊन जाते व हे दुःख आपणाला शेवटपर्यंत सांभाळावे लागणार आहे हे लख्खपणे जाणवते. आजही आश्रमात गेल्यावर ठाकूर यांच्या हॉलमध्ये प्रवेश करताच मला वाटतं की नेहमीप्रमाणे डोक्यावर पदर घेतलेली जप करणारी आईची मूर्ती आपल्याला दिसेलच, आजही घरी गेल्यावर पाळण्यावर बसलेली तू आठवतेच मला पाहताच तुझ्या चेहऱ्यावरील आनंदही आठवतो आताही वर जाताना मी तुझ्या दाराला बाल्कनीला आणि खुर्चीला स्पर्श करून मगच वर जाते. तुझ्या पावलांच्या ठशांना हात लावला की फार बरे वाटते. आपण आपल्या प्रेमाच्या लोकांवर दादागिरी करतोच अनेकदा मी तुला फोन करायची सकाळचे सहा वाजलेले असायचे मी म्हणायचे आई मी वर येणार नाही तू खाली येऊन बस मी थोडावेळ गप्पा करून परत जाईन. मी तेथे पोहोचेपर्यंत पंधरा मिनिटात तू गरम चविष्ट असे तिखट मिठाचे पराठे क...

Shrikant

प्रिय श्रीकांत आज तुझा वाढदिवस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो भविष्यात देखील तुला जे जे हवे असेल ते भरभरून मिळो हीच सदिच्छा तुझा जन्म हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा छान होता कारण त्याआधी काही दुःखद घटनेमुळे मन उदास होते तुझ्या आगमनाने आणि गोंडस रूपाने तू आम्हा सगळ्यांना खूप आनंद दिला मोठी आई पल्लवी मधुरा सगळे मामा सगळे खुश होते तुला वाढवणे मी खूप एन्जॉय केले मला ते कधी कठीण वाटले नाही कारण तू शांत आणि आनंदी बाळ होतास सारखा पल्लवी मधुरा च्या मागे खेळत असे सगळ्यांचा लाडका होता नंतर देखील कधी तू काही हट्ट केल्याचे मला आठवत नाही तुम्ही तिघेही भावंडे शहाणी व समजूतदार होती आम्ही आमच्या परीने तुम्हाला चांगले वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्याला तुम्ही यश आणि बळ दिले हुशार पण निघालेत चांगली शिकलेत त्याबाबतीत आम्ही भाग्यवानच आहे त्यामुळे मी तुला कधी अभ्यास कर असे म्हंटले नाही तूच मिस्कीलपणे मोठा झाल्यावर म्हणायचा कशी आई आहेस कधीच अभ्यासासाठी रागवत नाहीस मुली तर मला नेहमी म्हणतात श्रीकांत तुझा जास्त लाडका आहे खरेच आहे तू लहान असल्याने आणि माझ्याजवळ जास्त राह...

Pallavi

पल्लवी प्रिय पल्लवी , आज तुला 43 वर्ष पूर्ण होऊन 44 साव वर्ष सुरू झाले वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आज विचार केला तर विश्वासच बसत नाही तुझा जन्म झाला तेव्हा मी एकोणीस वर्षाचे होते लग्नानंतर एक वर्षात तुझा जन्म झाला आम्ही त्रिची ला राहात असल्याने प्रेग्नेंसी मध्ये बराच प्रवास झाला . रोज क्लबमध्ये जाणे गप्पा, बाईक वर फिरायला जाणे मी बिनधास्त केले नागपूरला आल्यावर पण आईकडे खूप एन्जॉय केले तू व्हायच्या आदल्या संध्याकाळी सीमा बरोबर पाणीपुरी खाऊन आले होते रात्री ऍडमिट होऊन सकाळी सात वाजता तू अगदी त्रास न देता नॉर्मल डिलिव्हरी होऊन आमच्या आयुष्यात आलीस मी रूम मध्ये आले तेव्हा आईने शिवलेल्या ब्ल्यू बॉबी प्रिंटच्या फ्रॉक मध्ये तुला दुपट्यात लपेटून ठेवले होते चांगले मोठ्या डोळ्यांनी तू आमच्याकडे बघत होतीस मला चांगले आठवते. खूप गोड बाळ झाल्याने सर्वजण खुश होते. आता मी एकोणीस वर्षाच्या मुली कडे पाहिले की मला आश्चर्य वाटते की आपल्याला काही कळायच्या आतच आपण आई झालो होतो आम्ही दोघे पण खूप खुश होतो तुला घेऊन त्रिची ला आलो लहान वय बरोबर सासुबाई मोठे कोणी नाही आई पण खूप लांब असल्याने जमेल तसे सांभाळले तू...

ऋणानुबंध

इमेज
ऋणानुबंध अम्मा मी लग्न होऊन 47 वर्षापूर्वी तमिळनाडूतील त्रिचनापल्ली किंवा त्रिची या गावी गेले तेथे भेल च्या टाऊनशिप मध्ये सात वर्षे राहून आमची बदली बडोद्याला झाली पण योगायोगाने सोळा वर्षांपूर्वी पुन्हा त्रिचितच माझ्या यजमानांनी दुसऱ्या कंपनीचा जॉब घेतला आणि आम्ही तीस वर्षांनी त्याच गावी राहावयास आलो पण आता टाऊनशिप मध्ये न राहता गावात भर वस्तीत मोठा बंगला भाड्याने घेतला सुंदर जुनी वास्तू समोर पोर्च मागेपुढे विस्तीर्ण अंगण त्यात नारळ केळी आंब्याची झाडे शिवाय फुलझाडे पण होती मोठमोठ्या खोल्या मोठा हॉल प्रशस्त किचन असे ते घर होते माझ्या दोन्ही लग्न झालेल्या मुली आणि मुलगा जो मद्रास मध्ये राहून सीए करत होता त्यांना ते घर फारच आवडले मुलाने तर त्याला मालगुडी डेज मधले घर अशी उपमा दिली तो दर पंधरा दिवसांनी येत असे अम्माही आम्हाला त्या घराबरोबर मिळालेली कामवाली होती घरमालकानेच आम्हाला ती मिळवून दिली काळी सावळी अंगाने सुदृढ आणि गोलू मोलू अशी अम्मा मद्रासी पद्धतीचे मंगळसूत्र आणि कानात आणि नाकात खड्याचे दागिने घालून हसऱ्या चेहऱ्याने सकाळी साडेसहाला हजर होई तिचे ना...