अनुभव

आई जाऊन जवळपास सात वर्षे झाली त्यापूर्वी मी बहुतेक वेळा एक-दोन दिवसाआड आईकडे जायचे दिवसभर किंवा तीन चार तास तिच्यासोबत राहून संध्याकाळी परत यायचं पण तिचा सहवास खूप छान मिळायचा मला नेहमी आश्चर्य वाटायचे की रोजच मी तिला भेटते पण मला पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरायचा मला गंमतच वाटायची पण आज त्याचा अर्थ काढतो आम्ही आता दोघेच असतो कोणी आलं तर किती आनंद होतो खूप बरे वाटते मुलांचे येणे हळूहळू कमी झाले त्यांचे व्याप वाढलेत
वय वाढल्यावर आपल्या माणसांना पाहून किती आनंद होतो हे ज्याचे त्याने अनुभवावे असो घरी येताना आई यांच्यासाठी काही फराळ द्यायची कधी लोणचे कधी लाडू कधी पराठे जे असेल ते प्रेमाने भरून द्यायची त्याचा मलाही खूप आनंद होता खूप छान दिवस होते ते
आज मी शोभा कडे गेले होते शोभा खूप दिवसानंतर येथे आली पूर्वी मी नेहमीच तिच्याकडे जात असे ती पण येत असे पण मध्यंतरी ती दोन वर्ष बंगलोरला होती आता ती आली तिच्या मुली तिला सोबत करतातच परवा मेघा येणार होती म्हणून आज तिने मला जेवायला आणि गप्पा करायला बोलावले आमची 32 - 34 वर्षांची मैत्री आहे आम्ही बिंदासपणे एकमेकांशी सगळ्या गोष्टी बोलू शकतो प्रेमाचे फार चांगले बंध आमच्यात आहेत खूप छान गप्पा झाल्या बाई स्वयंपाकाला असूनही शोभाने नेहमीप्रमाणे उत्तम स्वयंपाक केला होता छान टेबल लावून आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला बाईने मक्याची गरम रोटी बनवली 
मी अळूची भाजी घेऊन गेली होती मजा आली मेघाने कुल्फी ऑनलाइन पाठवली आमच्या मुलींना आमच्या मैत्रीची प्रेमाची चांगली जाण आहे. दिवसभर सुखदुःखाच्या गप्पा करून मी परत निघाले तर शोभाने मला तिच्याकडील आत्याने पाठवलेली कुरडया पापड बांधून दिलेत यांच्यासाठी कुल्फी आणि पालक पनीर डब्यात घालून दिले
पुढील भेटीचे ठरवून मी निघाले खरंच मला इतके समाधान वाटत होते आणि एकदम मनात लख्खपणे जाणवले आपल्याला आईकडून येताना जो आनंद व्हायचा तोच तर आहे हा! मैत्रीचे अनेक रूपे आहेत त्यात माया जिव्हाळा प्रेम असतेच आई इतक्याच प्रेमाने तिने मला या गोष्टी दिल्यात प्रेमाने आम्ही एकमेकींशी मनातल्या गोष्टी बोललो मन मोकळे झाले आणि एकदम डोळ्यात पाणी आले. माझ्या आईला शोभा फार आवडत असेल मला नेहमी तिचे उदाहरण देत असे राहवले नाही म्हणून हा अनुभव मी घरी आल्यावर लगेच शब्दबद्ध केला माझ्या आयुष्यात असे अनेक लोक आहेत त्यामुळे माझे आयुष्य सुंदर झाले आहे ही ठाकुरांचीच कृपा आहे असे मी मानते
स्मिता

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

स्पर्श

ऋणानुबंध