अरुणा


माझ्या यजमानांच्या नोकरी निमित्ताने आम्ही पूर्ण भारतभर फिरलो. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी(१९८८) आम्ही खापरखेडा येथे पावर स्टेशनला दोन वर्षासाठी बदली होऊन गेलो होतो. एक तर महाराष्ट्रात पोस्टिंग ते पण नागपूरला माझे माहेर, त्यामुळे एक तासाच्या अंतरावरील हे गाव म्हणजे सोने पे सुहागा झाले. आधी दोन वर्षे नागपूर येथे राहून आम्ही खापरखेडा येथे शिफ्ट झालो. आम्हीआनंदाने तेथील एम एस ई बीच्या  कॉटर मध्ये शिफ्ट झालो.  बैठी घरे होती. रस्त्याच्या एका बाजूला बी एच ई एल चे अधिकारी आणि समोर एम् एस्ल ई बी चे अधिकारी रहात होते. मुलींना सेंट जोसेफ कॉन्व्हेंट कामठी मध्ये प्रवेश मिळाला. मुलगा लहान असल्याने छान चालले होते, पण काही दिवसातच त्या छोट्याशा गावात कसा वेळ घालवावा असा प्रश्न पडू लागला. तेव्हा आईच्या चुलत बहिणीची मुलगी माझ्या समोरच्या कॉटर मध्ये राहते असे समजले. अरुणा  हे तिचे नाव. मी तिला कधी भेटले नव्हते पण तिथे तिचे लग्न होऊन ती मुंबईला असल्याचे ऐकले होते, नंतर दुर्दैवाने ते यजमान एका अपघातात गेल्याचे समजले. तिचा पुनर्विवाह झाल्याचे पण कळले असो ती समोरच राहते हे  कळल्याने मला राहवले नाही आणि मी तिला भेटायला गेले. पहिल्या भेटीत ती कमी बोलणारी वाटली पण आमच्या दोघींच्या आईंचे संबंध फार जिव्हाळ्याचे असल्याने बोलायला विषय होता. मी बोलकी असल्याने तिला भेटू लागले तिची मुलगी माझ्या मुला एवढीच असल्याने ते निमित्त होते हळूहळू कमी बोलणारी  ती माझ्या घरी येऊ लागली त्या छोट्याशा गावात आम्ही एकमेकींच्या सोबतीने आमचा वेळ घालवू वेळ घालवू लागलो. तिचा पुनर्विवाह होता श्रीयुत काथे यांना आधीची दोन मुले होती. सासुबाई व छोटा मुलगा तिच्यासोबत राहत होते हळूहळू आमच्या सहवासाने आमच्या  जिव्हाळा वाढू लागला. आम्ही एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी कधी झालो हे कळलेच नाही


ती अबोल व अंतर्मुख तर मी मोकळी आणि बडबडी मला खूप मैत्रिणी या स्वभावाने आमच्यातील जवळीक कधी वाढली हे कळलेच नाही. तिच्या बोलण्यातून कळले की पहिल्या विवाहानंतर दहा वर्षे तिला मूल नव्हते. तिला मूल नसल्याने व तिच्यावर निरतिशय प्रेम करणारा नवरा या दोघांचे एक सुंदर विश्व होते. त्या सुखा मुळे ती मुलं नसल्याचे दुःख विसरून गेली होती, पण दुर्दैवाच्या एकाच फटक्याने होत्याचे नव्हते झाले. ती घरी एकटी असताना मुंबईसारख्या ठिकाणी तिला निरोप आला की तिचा सहजन  अपघातात गेला, हे ऐकल्यावर ती पुढचे सहा महिने शुद्धी वरच नव्हती. तिने खाणेपिणे पण सोडले पण आई वडील आणि अतिशय प्रेम करणारे तीन समर्थ भाऊ यांनी तिची पूर्ण काळजी घेऊन तिला माणसात आणले या घटनेनंतर ती आणखीनच एकाकी आणि मनस्वी झाली. नवीन लोकांशी भेटण्याला बोलण्याला कचरू लागली. म्हातार्‍या आई-वडिलांनी सुज्ञपणे आणि जगरहाटी ला धरून तिचा पुनर्विवाह करून दिला. तिने फार प्रतिकार केला पण शेवटी तिला हार मानावीच लागली. देवाची कृपा म्हणावी की तिला कन्यारत्न प्राप्त झाले हाही चमत्कारच म्हणावा कदाचित तिच्या मोठ्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी देवाने तिलाही गोड भेट दिली असणार. हळूहळू तिच्या स्वभावातील संकोची पणा गळून ती एक आत्मविश्वासू आणि सगळ्यांशी हसून खेळून बोलणारी अशा स्त्री मध्ये तिचे रूपांतर मी दोन वर्षाच्या माझ्या तेथील वास्तव्या मध्ये पाहिले, अनुभवले. तिच्या बरोबर केलेल्या गप्पांमध्ये मला असे प्रकर्षाने जाणवले की केवळ पुस्तकी ज्ञान आणि पदव्या घेऊन माणूस मोठा होत नाही विद्वान होत नाही तिचा आयक्यू इतका चांगला होता की मी  आश्चर्यचकीत होत असे. बोलताना ती इतक्या सुंदर गोष्टी बोलून जात असे की मला तिथे कौतुकच वाटायचे माझ्या बऱ्याच मैत्रिणी उच्चविद्या विभूषित आहेत काही आपापल्या प्रांतात प्राविण्य मिळवून उत्तम व्यवसाय करीत आहेत पण अरुणा जेमतेम मॅट्रिक झालेली फारशी घराबाहेर न पडलेली अशी असूनही तिचे विचार प्रगत आणि काळाच्या पुढचे असत याची मला फार गंमत वाटे मी तिच्या पेक्षा नऊ-दहा वर्षे लहान होती तिने माझे फार लाड केले मला आजही आठवले की भरून येते आमचे आमचे नवरे आणि मुले शाळेत गेली की हातावर गरम भाकरी त्यावर ठेचा घेऊन अरूणाबाई धावत येत आणि मला अंगणात ओढत नेऊन ती भाकरी खाऊ घालत असे मला आजही आठवते गरम तव्यावरची पुरणपोळी काढली की लगेच माझ्या घरी धावत येत असे तिने माझ्यावर वेड्यासारखे प्रेम केले माझ्या मोकळे केस गाऊन मध्ये अवतारात असणाऱ्या ध्यानाचे पाच मिनिटात साडी नेसून लिपस्टिक लावून तिच्याबरोबर हळदी कुंकाला जाण्याचे रूपांतर तिला खूप कौतुकाचे असे त्यावर अभ्यंकर यांना दोन बायका आहे एक अशी तर दुसरी तशी अशी टिपणी पण करत असे.  तिच्यामध्ये इर्षा दुसऱ्यांबद्दल दुजाभाव मी कधी पाहिला नाही. स्मिता माझा नवरा तुला पाहून मला म्हणतो की मग तिच्याकडे बघून जगण्याची इच्छा होते हे सगळं स्पष्टपणे निरागसपणे सांगून मिस्कील हसणारी अरुणा मला फार भावते ्माझी मावशी आणि तिची भावंडे माझ्यावर प्रेम करायला लागली कारण ते म्हणत अरुणाची एकच जिवलग मैत्रिण आहे ती म्हणजे बड प्रस्थ मला खुप हसू येई आमच्या आवडी ही फार जुळत चांगले कपडे चांगला स्वयंपाक आणि भाजी खाण्याची व आणण्याची आवड हौसच त्या खेडेगावात आठवडी बाजारात आम्ही दुपारी दोन वाजता उन्हामध्ये जाऊन खूप सारी घेऊन येत असू सगळे आम्हाला हसत पण आमच्यासाठी हसत खेळत घेतलेला एक अनुभव असे जो आजही आमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवतो त्या गरीब भाजी वाल्यांच्या दुपारी कपड्यात बांधून आणलेली झुणका भाकर पाहून अरुणा म्हणायची, स्मिता यापुढे आपले पंचपक्वान्न फिके आहेत. आपले डबे भांड्यांनी भरलेले स्वयंपाक घर म्हणजे फापट पसाराच होय.  एक झोपडी त्यात भाकरीचे पीठ आणि भाजी तेल तिखट मीठ एवढे पुरे आहे त्यालाच अमृताची चव आहे अशी जगावेगळी आपल्या मनाप्रमाणे जगणारी मैत्रीण अवचितपणे देवाने मला मिळवून दिली याबद्दल मी त्याची ऋणी राहील आज तीस वर्षानंतर देखील आम्ही तितक्यात प्रेमाने एकमेकींना भेटत असतो. तिची मुलगी इंजिनीयर होऊन तिची काळजी घेते आहे. आजही भेटली की हातातल्या नोटा माझ्या हातात कोंबत म्हणते साडी घे. प्रेमाने मी तिला मिठी मारते आणि हसून म्हणते, अरुणा वेडी आहेस का नोटा तर मोजत जा





 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्पर्श

ऋणानुबंध