Sarita
सरिता
अगं किती या ऱ्हस्व-दीर्घ च्या चुका साधं शुद्ध मराठी पण नीट लिहिता येत नाही असा म्हणून मॅडमने फेकून दिलेला पेपर उचलताना तिच्या डोळ्यात अश्रू आलेत पण ते तिने निकराने परतवले आणि स्वतःला सावरले.
चोवीस पंचवीस वर्षाची ती स्वतःच्या मूकबधिर मुली साठी नागपूर हुन आपल्या दोन छोट्या मुलांना सासूबाईंच्या हवाली करून पुण्याला एक वर्षाच्या ट्रेनिंग कोर्ससाठी आली होती तिचे शिक्षण नांदेड जवळील छोट्याशा गावात झाले होते आंध्रा जवळच्या छोट्याशा गावातील शाळेत मराठी यथातथाच शिकविल्या गेले होते. मॅट्रिक नंतर लगेच लग्न झाले. मुलीच्या भविष्यासाठी उपयोगी पडेल म्हणून हा कोर्स करण्यासाठी ती पुण्याला आली होती दर महिन्यात नागपूरला मुलांना भेटण्यास जात होती तिच्या यजमानांचा आणि घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता पण तिची शारीरिक आणि मानसिक दमछाक होत होती. स्वभावाने ती कष्टाळू आणि जिद्द असल्याने चांगला अभ्यास करून तिने अखेर जिंकले त्यावर्षी फायनल मध्ये टॉप केले. परत येऊन मूकबधिर शाळेत 28 वर्षे नोकरी केली मुलीला मात्र नॉर्मल शाळेत पाठवून तिचा अभ्यास घेऊन तिला शिकविले आणि जगात वावरण्यासाठी समर्थ बनविले आदर्श शिक्षिका झाली . मुलांसाठी पतीबरोबर त्यांच्या बदलीच्या गावी न जाता येथेच राहिली आणि नोकरी मुले सासू सासरे या सगळ्यांची जबाबदारी उत्तम रित्या पार पाडली.
अशीही ही सरिता देशपांडे माझी तीन चार वर्षापासून ची झालेली नवीन मैत्रीण तिचा परिचय झाल्यावर तिची कहाणी ऐकल्यावर मी फार प्रभावित झाले स्त्रीमधील दैवी शक्ती वर माझा फार विश्वास आहे.
त्यानंतर तिने ग्रॅज्युएशन केले पोस्ट ग्रॅज्युएट पण झाली आता ती रिटायर झाली आहे आम्ही मॉर्निंग वॉकला भेटलो होतो तेथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आता तर आम्ही रोज फिरणे झाले की तासभर बसून गप्पा करतो आम्ही एकत्र एक्जीबिशन्स बघायला जातो वाचनाची कॉमन आवड असल्याने त्यावर चर्चा करतो एखाद्या चांगल्या प्रोग्राम किंवा सिनेमा पाहिला तर त्यावर गप्पा होतात ती दोघे मुलगा सुन आणि नाती बरोबर राहतात मुलगी पण येथेच लग्न करून सेटल झाली छान नोकरी करते नात पण आहे यामागे या उभयतांचे खूप कष्ट आहेत. छोट्याशा गावातून आलेली सरिता आज कोर्टात जाऊन मूकबधिर मुलांच्या बाजूने त्यांची बाजू मांडते त्यांचे कौन्सिलिंग करते शिवाय साईन लँग्वेज मध्ये नवीन शिक्षकांना ट्रेनिंग पण ऑनलाईन देते हे सर्व घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून याचं मला फार कौतुक वाटते ती तिच्या नातीन ची आवडती आजी आहे मैत्रीण देखील आहे टू व्हीलर वर त्यांना बसवून शॉपिंग करवते नवनवीन प्रयोग करण्याचा फार उत्साह आहे . आरोग्याच्या बाबतीत फार जागरूक असते. कमी बोलणारी आणि स्वभावाने फार संकोची आहे आता दोन तीन वर्षाच्या सहवासाने मोकळी झाली आहे खरेदीची आणि फिरण्याची आवड आहे दिवसभर कधीही बाहेर जाण्यास तयार असते कष्टाळू पण आहे व्यायामाची आवड आहे .
मैत्री ही नवीन किंवा जुनी नसते एकदा सूर जुळले की मग त्याला वयाचे आणि वेळेचे बंधन नाही याचा आम्हा दोघींना नेहमी प्रत्यय येतो आयुष्याच्या या वळणावर इतकी छान मैत्रीण मिळाली आम्ही सर्व सुखदुःखाच्या गोष्टी मोकळेपणाने एकमेकींशी शेअर करू शकतो. खुप हसतो कधी डोळ्यात पाणी देखील येते पण हे रोज सकाळचे टॉनिक घेऊन आम्ही घरी येतो पुढचा सर्व दिवस त्यामुळे चांगला जातो दुसऱ्या दिवशीच्या भेटीची आस असते . अशीही आमची मैत्री कायम वाढत राहो हीच सदिच्छा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा