Avantika
नवरात्र सुरू झाले की माझ्या काही मैत्रिणी सोबत पहाटे आळीपाळीने दुर्गा देवी रेणुका माता ललिता गौरी अशा मंदिरांमध्ये नऊ दिवस आम्ही पहाटे दर्शनाला जातो हा बरेच वर्षापासून केलेला नेम आहे विचार केल्यावर मला असे वाटले देवी ही शक्तीचे रूप आहे आपण त्यासाठी मंदिरात जातो माझ्या ज्या प्रिय मैत्रिणी आहे त्यांच्यामध्ये काही खास गुण आहेत जे मला भावतात स्त्रीशक्तीची अनेक रूपे मला त्यांच्यात दिसून येतात त्यामुळेच त्या माझ्या लाडक्या आहेत हे त्यांना कळावे म्हणून हा लेखन-प्रपंच अवंतिका पुजारी ती माझ्यापेक्षा पाच-सहा वर्षे लहान मैत्रीण मला खापरखेडा येथे भेटली आम्ही बडोद्याहून बदलून गेलो होतो तिचे पती तेथे एम एस ई बी मध्ये नोकरीला होते छोटीसी टाऊनशिप होती मला शिवणाची आवड होती तेव्हा असे कळले की ही मुलगी हॉबी क्लासेस घेते ती पार्लर पण चालवते शिवाय जिम भरत नाट्यम अॅपलीक वर्क इत्यादी बरेच काही शिकवते मी तिचा फॅशन डिझाइनिंग चा क्लास लगेच जॉईन केला मी तिची पहिली स्टुडन्ट होते रोज दुपारी दोन ते चार मी तिच्याकडे जायचे हळूहळू या हसतमुख मोकळ्या मनाच्या हरहुन्नरी मुलीने माझे मन जिंकून घेतले आमच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण होऊ लागले खूप गप्पा सोबत शिवण असे सुरू होते मी नवीन नवीन गोष्टी शिकत होते सरावाने त्यात सफाई आली होती इतक्या लहान वयात तिच्यात लोकसंग्रह करून तो टिकविणे ही समज फार छान होती ती आपल्या प्रत्येक कामात तरबेज होती तिच्या या स्वभावाने तिच्या क्लासेसला चांगली गर्दी व्हायला लागली ती एम एस सी टेक्स्टाईल या विषयाची युनिव्हर्सिटी टॉपर होती तिने या छोट्याशा गावातील कित्येक स्त्रियांना तरबेज केले जिम मध्ये जाण्यास प्रवृत्त केले मेहंदी वेगवेगळी फुले बनवणे अॅपलीक वर्क बटीक कला इत्यादी विषयांचे क्लासेस घेऊन स्त्रियांना त्यात रस निर्माण केला तिचा मोठा हॉल आणि दोन खोल्या किचन सुद्धा मुली बायकांनी भरलेला असायचा लोकांना कम्फर्टेबल करणे ही तिची खासियत होती आठवड्यातून एकदा जाऊन ती नागपूरहून सगळ्या वस्तू घेऊन येई त्यामुळे सगळ्यांची सोय होई उत्तम नवीन डिजाईनचे फ्रॉक शिवणे ती उत्तम करीत असे मी वर्षभर तिच्याकडे बऱ्याच गोष्टी शिकले एका अर्थी ती माझी लहान असून सुद्धा गुरुच आहे असे मी मानते आणि मला या एक वर्षाने जन्मभरासाठी खूप चांगली समजदार मिस्कील अशी मैत्रीण मिळाली त्यानंतर आम्ही नागपूरला परत आलो तिच्या प्रेरणेमुळे मीसुद्धा काही वर्ष हॉबी क्लासेस घेतले काही ऋणानुबंध असे असतात की अवंतिका आठ दहा वर्षांनी नागपुरात शिफ्ट झाली आणि माझ्या घराजवळ तिने घर घेतले तेथे जवळच स्वतःचे पार्लर आणि बुटीक सुरू केले आज तीस-पस्तीस वर्षे झाली आमची मैत्री दिवसेंदिवस दृढ होत आहे माझ्या मुलींची ती लाडकी मावशी आहे त्यांच्या लग्नांमध्ये तिने त्यांना उत्तम रित्या मेकअप आणि साडी मध्ये तयार केले सगळ्यांनी फार कौतुक केले एकदा तर ती पायाचे ऑपरेशन होऊन आजारी होती पण तिने स्वतः मेकअप करून दिला या दुखण्याने तिला एक दीड वर्ष फार त्रास दिला पण कधीही तिच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले नाही आता ती फार बिझी असते तिथे बुटीक हे नागपुरातील प्रसिद्ध बुटीक आहे अनेक मान्यवर लोक तिच्याकडे कपडे शिवण्यासाठी गर्दी करतात अतिशय मेहनती आणि हसतमुख असल्याने ती सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेते तिच्याकडे पंधरा-वीस लोकांचा स्टाफ आहे अमेरिकेत दोन्ही मुले असल्याने तिथे गेली तरीसुद्धा सर्व ऑर्डर्स ती तेथून इन्स्ट्रक्शन देऊन व्यवस्थित पूर्ण करते मी जाता-येता तिला जाऊन भेटत असते आनंदाने मिठी मारून आम्ही गप्पा करतो कितीही बिझी असलीतरी ती माझा फोन उचलते वर स्मिता तू एकटीच माझी मैत्रीण आहेस बाकी सर्व क्लायंट्स आहेत असे म्हणून मला खूष करत असते लॉक डाऊन मध्ये ती घरीच असल्याने आम्ही खूप गप्पा केल्या अनेक रेसिपीज शेअर केल्या तिने उत्तम उत्तम ब्रेड पिझ्झा पाव बनवले आणि त्याचे फोटोज शेअर केले अशीही माझी हसतमुख आणि धडाडीची मैत्रीण माझी फार लाडकी आहे तिची पुढील आयुष्यात अशीच भरभराट होवो ही सदिच्छा

Dear Smita ...
उत्तर द्याहटवाRatriche 1.50 zale ani boutique chya call ni uthali, rojacha kam suru zala , tyatach tuza massage wachla ani speechless zali 😘....
Pan tula reply kelyashivay zopuch shkanar nahi ! Apli swatashich kuni itaki god olakh karun dili ki malahi tya awantika shi bhetavasa watayala lagala 😄
Kharach devache khup khup abhar ahet ki tyani mala don don niswarth prem karanarya mothya bahini dilya 🙏🏼 Mazypeksha mothi asunahi barobaricya natyani mazi maitri swikarli ani malahi kadhi to farak janavala nahi karan manacha kahi vay nasta and you are ever young by heart 😄👍🏼kharatar tuzyawar kahi lihayala gele tar shabdach kami padatil pan he kunala sangayachi garaj nahi karan Je tula olakhtat tyana ha anubhav aselach . Today it’s a very rare phenomenon to praise any one without personal interest to tuzyat ahe . Me khup Bhagya wan ahe ashi nigarvi maitrin mala milali mhanunach mala khup veloveli protsahan milala 🙏🏼😘Apali creativity satisfy karayala chhotamotha kam karate tyat 32 employees cha ghar chalata ani me khush hote bas itakach ! Pan tu tyacha kautukani khup varnan kelas 😊
Tuzya tinahi khup god scholar ani guni mulancha success bghitla tar yatach tuzya sarva gunancha andaj gheta yeto .Swataha la aplya family sathi purnapane samarpit karun tu tyanna je motha kelas te khup khup inspiring ahe . Kam karun paise kamavana khup sopa ahe pan tya pashanni te vikat gheta yet nahi Je tu kamavalas 🙏🏼kalat na kalat tuzyakadun mihi barach kahi shikle tenvha tuch mazi mothi bahin ya natyani guru 🙏🏼!! Tuza prem asach nirantar milat raho ani tula udanda ayushya arogya labho hich ishwarcharani prarthana 🙏🏼🌹😘
Sakalche 4.50 zale ata ek tas zopnyacha prayatna karate 😄dole mothe karun karun type kelay, chulanna hasu nako , mala far kahi marathit lihita yet nahi tuzyasarakha manapasun watala te lihila 😄😘👋🏻
By Avantika Pujari