माधवी मार्डीकर


 लहानपणीची मैत्रीण खूप वर्षानंतर भेटल्यावर जो आनंद होतो तोच मला माधवी भेटल्यानंतर झाला. ती नागपूरलाच आहे हे मला माहिती होते,  पण मध्यंतरी मुलांचे शिक्षण लग्नकार्य यामुळे भेटीचा योग आला नाही आम्ही पन्नासाव्या वर्षी भेटलो.  जवळपास 38 वर्षानंतर पण एकदा भेटल्यावर मात्र मधले अंतर जाणवलेच नाही. आम्ही तशाच होतो.  ती शांत मृदुभाषी मी बरेच बोलणारी ती आई-वडिलांच्या घरात राहत असल्याने जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही शाळेत असताना एकमेकींकडे जात असू. आता आम्ही एकमेकींना भेटू लागलो माधवी बद्दल या आठ-दहा वर्षात झालेल्या आमच्या सहवासात मला तिची विविध रूपे आठवतात. मध्यंतरी यजमानांचे अकाली निधन झाल्याने पहाडासारखे दुःख झेलूनही धीराने आणि संयमाने पूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणारी माधवी,  ती घरात नर्सरी चालविते.  त्यासाठी कष्ट घेणारी माधवी येणाऱ्या लोकांशी शांतपणे बोलून त्यांना माहिती देणारी माधवी, तिच्या शेतावर पण नर्सरीचे कामे होतात. तेथे मोठ-मोठी रोपे बनविली जातात.  दर आठवड्याला तेथे जाऊन लोकांकडून व्यवस्थित कामे करून घेणारी माधवी, त्याचबरोबर बँकेचे आणि आर्थिक व्यवहार स्वतः कायम सांभाळणारी माधवी, समितीला नियमित जाणारी,  या वयात गाण्याची आवड म्हणून त्याचा क्लास करणारी माधवी गीतेचा अभ्यास आणि पाठांतर करणारी माधवी, उत्तम ड्रायव्हिंग करणारी माधवी ही सर्व कामे ती शांतपणे सहजरीत्या करीत असते. हे सर्व करून आम्हा सर्व मैत्रिणींचे आनंदाने स्वागत करते.  या ग माझ्याकडे असे कायम आमंत्रण असते.  सगळ्या नातेवाईकांशी तिथे स्नेहपूर्ण संबंध आहेत.  आम्ही दोघी बरेचदा भेटतो.  तिच्या शेतावर पण जाऊन डब्बा पार्टी करतो.  खूप हास्यविनोद होतो एकमेकींच्या वाढदिवसाची पार्टी पण होते.  तिचा मुलगा अनुभव,  सून स्नेहा आणि दोन नाती रेवा आणि अस्मि आणि माधवी यांचे खूप गोड कुटुंब आहे. ती दोघे माधवीची खूप काळजी घेतात  नातींना तिचे फार वेड आहे माधवीचा 61 वा वाढदिवस मुलांनी खूप थाटात साजरा केला.  स्नेहा तर तिची मुलगीच आहे, तिला आईच म्हणते. आमचेही खूप अगत्याने स्वागत करते. मला तिचे सौम्य व्यक्तिमत्व आणि केअरिंग स्वभाव फार आवडतो.  वेळोवेळी फोन करून खुशाली विचारते. माझ्या प्रत्येक पेंटिंग चे शिवणकामाचे लेखनाचे तिला फार कौतुक आहे. नेहमी बिझी राहणारी, एकदा तर फोन केला. तू काय करतेस तर म्हणाली, मी सेमिनार हिलवर कडुनिंबाच्या निंबोण्या वेचते. मला खूपच गंमत वाटली.  नर्सरीतील रोपांची लहान बाळांसाठी काळजी घ्यावी लागते, ती ते उत्तम रित्या घेते. नेहमी आनंदी राहणारी हसत मुख माधवी माझे इन्स्पिरेशन आहे आम्ही शाळेतील काही मैत्रिणी शोधून काढल्या.  खूप गप्पा झाल्यात शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाला. आयुष्याच्या या वळणावर माधवी सारखी समंजस आणि प्रेमाने काळजी घेणारी मैत्रीण मला गवसली, यात पूर्वजन्मीचे काही ऋणानुबंध नक्कीच आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

स्पर्श

ऋणानुबंध