Hema
हेमा
अकोल्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये मी थर्ड इयर ला 1976 मध्ये ऍडमिशन घेतली. कॉमर्सला मुली कमी असायच्या, वर्गात 40 मुले आणि जेमतेम दहा-बारा मुली होत्या. बहुतेक मुली गावातून येत होत्या. फक्त हेमा कानेटकर नावाची मुलगी आमच्या क्वार्टर्स कडून येत होती. तिची ओळख झाली आणि मला बरे वाटले, कारण एकटीने सकाळच्या वेळी दोन किलोमीटर येणे जाणे बोअर होते. तिचे घर माझ्या थोडे आधी होते, पण फोनची सोय होती. त्यामुळे आम्ही एकत्र कॉलेजला येऊ लागलो हेमा माझ्यासारखीच बडबडी आणि मोकळ्या स्वभावाची असल्याने आमचे सुर जुळले. आमच्या क्राफ्ट च्या आणि वाचनाच्या आवडी कॉमन होत्या, गाणे ऐकणे पण त्यात सामील होते. कॉलेज सकाळी अकरापर्यंत असायचे. त्यानंतर घरी येऊन जेवण झाल्यावर दोनच्या सुमारास आम्ही दोघी जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉबी क्लासला जाऊ लागलो निरनिराळ्या बॅग तयार करणे सॅटीन ऑरगंडी सुंदर फुले बनवणे हेअर स्टाईल शिकणे त्यानंतर मार्केटला जाऊन जरुरी वस्तू घेऊन घरी येणे यात संध्याकाळ होत असे आमचा आता दिवसभराचा सहवास सुरू झाला आणि एका छानशा मैत्रीला सुरुवात झाली हेमा उत्कृष्ट भरत काम करायची तिचा साधा सरळ स्वभाव मला फार आवडतं असे क्लासला सुट्टी असली की दुपारचा हिंदी मॅटिनी आम्ही नक्की पहायचो घरी दोघीही भावंडांमध्ये मोठ्या होतो आणि एकमेकींची सोबत असल्याने कधी विरोध झाला नाही 75 पैसे हे लेडीज चे तिकीट असायचे आम्ही उत्तम असे वीस पंचवीस तरी ब्लॅक अँड व्हाईट हिंदी सिने मे पाहिलेत येताना भेळपुरी पाणीपुरी असा बेत असायचा दिवसभरात आम्ही चार-पाच किलोमीटर तरी पाई चालायचो पण काही जाणवायचे नाही आमच्या हास्यविनोदात सारा रस्ता संपून जायचा पण गप्पा संपायच्या नाही इंग्लिश स्पिकिंग चा क्लास सुद्धा आम्ही शोधला होता अशी खूप मजा आम्ही त्या एका वर्षात केली कॉलेजमधील अभ्यासात सुद्धा कसूर केली नाही तेथे पण आमची जोडी प्रसिद्ध होती पण हे वर्ष पण दादांच्या नागपूरच्या बदलीने संपुष्टात आले आम्हाला दोघींना फार वाईट वाटले माझे एक वर्षाने लग्न झाले हेमा पण लग्न होऊन मुंबईला गेली पत्रव्यवहार पण कालांतराने संपला दहा-बारा वर्षाने आम्ही नागपूरला बदलून आलो आणि मी हेमा चा शोध घेतला तिच्या आईकडून कळले की ती नागपूरलाच आहे तिच्या आईच्या घराजवळ राहते मला प्रचंड आनंद झाला आम्ही पुन्हा भेटलो आमची मुले पण एकाच शाळेत होती दोघी टुविलर चालवत असल्याने पाच-सहा किलोमीटर अंतर आमच्यासाठी काहीच नव्हते वेळात वेळ काढून एकमेकींना भेटत राहिलो दोघींना शिवणाची फार आवड होती हेमा उत्तम लहान मुलांचे कपडे शिवायची ऑर्डर घेऊन उत्तम भरत काम करून फ्रॉक्स दुपटे शिवत असे सासूबाईंच्या हाताखाली ती अगदी सु गृहिणी झाली होती निरनिराळे गोड पदार्थ ती उत्तम बनवत असे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा तिच्यात होताच घरातील सगळे सणवार अगदी मनापासून करत असे बहुतेक वेळा मी तिच्याकडे सवाष्ण म्हणून जेवायला जात असे आणि तिच्या हातचे चविष्ट जेवण देवीचे माझ्या मुलांना तिने बनवलेले चिरोटे आणि ओल्या नारळाच्या करंज्या फार आवडत मी कधीही फोन करून तिला सांगत असे हेमा आज बुक एक्जीबिशन ला किंवा सिल्क एक्झिबिशन ला जायचे आहे तू तेथे पोच तर कधी ही काहीही कारण न सांगता हेमा तिथे माझ्याआधी पोहोचलेली असायची माझा हुकुमाचा एक्का होती ती कधीही मदतीसाठी तयार असायची नवरात्रात देवी दर्शनासाठी आम्ही कायम एकत्र जायचो माझ्या मैत्रिणी हळूहळू तिच्या पण मैत्रिणी झाल्यात तिच्या स्वभावामुळे ती सगळ्यांशी आनंदाने मिसळायची सगळ्यांना मदत करण्याच्या तिच्या स्वभावामुळे तिला कधी कधी त्रास पण व्हायचा मीच तिला कधीकधी रागवायचे पण ती बदलली नाही अचानक तिच्या यजमानांच्या कामाच्या निमित्ताने त्यांना पुण्याला शिफ्ट व्हावे लागले आम्हा दोघींना वाईट वाटले आता फोन असल्याने दर आठ दिवसांनी आम्ही बोलू लागलो मी पुण्याला गेले की तिला भेटते ती पण येथे माहेर असल्याने दर चार-पाच महिन्यांनी येते आणि मला भेटते भेटल्यावर इतक्या गप्पा असतात कि मधला काळ पुसला जातो. आम्ही एकमेकींच्या भेटीची आतुरतेने वाट बघत असतो ऋणानुबंध यालाच म्हणत असावे आज आमच्या मैत्रीला 45 वर्ष होतील. आमची ही मैत्री अशीच कायम राहो.

स्मिता खूप छान वाटलं वाचून.आपली मैत्री खरंच खूप छान आहे.आपण रोज बोलतो असेही नाही.पण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला वेळेचं भान पण रहात नाही.
उत्तर द्याहटवा