kishori

 


सोलमेट हा शब्द मी माझ्या मुलीकडून तिच्या मैत्रिणीच्या संदर्भात तिने वापरला होता तो मला प्रचंड आवडला खरंच आहे आयुष्याच्या वळणावर सुरुवातीला किंवा उशिरा जरी कोणी आपले भेटले तरी ते आपले सोलमेट असू शकतात. हे आपल्या आयुष्यात मोजकेच असतात मग ते नातेवाईक किंवा मित्र कुठल्याही रुपात असू शकतात. सहा-सात वर्षापूर्वी मी सकाळी ज्या बगिच्यात मॉर्निंग वॉकला जात असे तेथे चाळीस-बेचाळीस वर्षाची स्त्री मला नवीनच फिरायला दिसू लागली उंच गोरी सुस्वरूप पण तिला काही शारीरिक त्रास असल्याचे जाणवले. का कोण जाणे मला ती पाहताच आवडली आणि तिच्याशी बोलावेसे वाटले एकदा दोघीही बाकावर बसले असताना मी संभाषण सुरू केले तेव्हा तिचे नाव किशोरी असल्याचे समजले. ती जवळच राहत होती तिला पाठीचे दुखणे असल्याने तिने फिरणे सुरू केले होते शांत स्वभावाची मृदुभाषी किशोरी माझ्यापेक्षा जवळपास दहा वर्षांनी लहान होती हळूहळू आम्ही भेटायला लागलो रोज थोडावेळ बसून गप्पा सुरु झाल्या. एखाद्या दिवशी भेट न झाल्यास चुकल्या सारखे वाटू लागले. आमच्या मैत्रीची छान सुरुवात झाली. तिने चिकाटीने नियमितपणे जिम जॉईन करून आणि नेमाने फिरणे यामुळे तिच्या दुखण्यावर मात केली मनाचे सुर एकदा जुळले की मैत्री व्हायला वेळ लागत नाही. त्यात दोन्हीकडून आपलेपणा आणि स्नेह असेल तर सोने पे सुहागा बाबतीत पण हेच झाले. किशोरी फार लाघवी आणि प्रेमळ मुलगी आहे तिच्या या स्वभावाने मला जिंकून घेतले आहे. तिच्या घरी सासु सासरे आहेत त्यांची ती फार काळजी घेते घरातल्या सगळ्या नातेवाईकांचे ती फार आपुलकीने स्वागत करते सगळ्या सगळ्या भाच्या पुतण्यांचे ती खूप लाड करते सगळ्यांच्या आवडी जपते त्या त्या वयोगटातील लोकांचे त्यांना आवडतील अशा पद्धतीने तिच्या घरी स्वागतच आहे घरासाठी आणि बगीच्यासाठी देखील कष्ट घेते सगळ्या गोष्टी देखण्या आणि सुंदर झाल्या पाहिजे यावर तिचे बारीक लक्ष असते. किशोरी मध्ये कधीही मत्सर किंवा कोणाबद्दल अपशब्द मी कधीही ऐकला नाही. सगळ्यांच्या आनंदात आपला आनंद शोधणे हा तिचा गुण फार दुर्मिळ आहे नेहमी हसतमुख आणि स्वभावातील निरागस पणामुळे ती माझी लाडकी मैत्रिण झाली आहे श्री राम कृष्ण परमहंस हा आमच्यातील एक मजबूत दुवा आहे. दोघींनीही मठाची दिक्षा घेतलेली आहे तेथे आमची दोघींचीही फार श्रद्धा आहे प्रत्येक उत्सवाला आम्ही तेथे जात असतो मॉर्निंग वॉकला तर आम्ही भेटतच असतो शिवाय पंधरा-वीस दिवसाआड एकमेकींकडे जाऊन मनसोक्त गप्पा होतात खरेदीची नवीन कपड्यांची दोघींनाही आवड आहे खरेदी एकमेकींना दाखवणे हा आमचा आवडता कार्यक्रम असतो. आम्ही बऱ्याच विषयांवर गप्पा मारतो तिने अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठातून बीटेक ची पदवी घेतली आहे वयाचे अंतर हे आमच्या मैत्रीत कधीही आले नाही कधीही भेटली की इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत करते. आम्ही दोघेच घरी असल्याने काही नवीन डिश केली की आठवणीने घेऊन येते. आम्ही सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकींशी मोकळेपणाने शेअर करू शकतो आमची ओळख जरी या पाच-सात वर्षातली असली तरी आमच्यातील अकृत्रिम प्रेमाचे हे बंधन असेच कायम राहो आयुष्याच्या या वळणावर भेटलेली इतकी गोड आणि समजूतदार मैत्रीण मला लाभली हे माझे सुदैवच आहे पाच मिनिटांच्या अंतरावर राहत असल्याने आम्ही कायमच एकमेकींच्या जवळ राहणार आहे आज तिचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने तिला अनेक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत पूर्ण करते ईश्वर तिच्या सर्व इच्छा पुर्ण करो आणि ती अशीच आनंदी व हसतमुख राहो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

स्पर्श

ऋणानुबंध