Shobha
आम्ही नागपूरला स्वतःचा फ्लॅट घ्यायचे ठरविले आणि आवडीनुसार एक फ्लॅट बुक केला दुसऱ्या मजल्यावर प्रशस्त फ्लॅट होता पझेशन लगेच मिळणार होते आईच्या घराजवळ असल्याने मी खुश होते मुलांची शाळा पण पाच मिनिटं अंतरावर होती तेथे असे कळले की यांच्या ऑफिस मधील श्रीयुत मेश्राम यांनी पण आमच्या खालच्या मजल्यावरील फ्लॅट बुक केला आहे आम्ही त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो तेथे मी प्रथम मेश्राम म्हणजेच शोभा ला भेटले सौम्य व्यक्तिमत्व व्यवस्थित साडी नेसलेली लांब वेणी असलेली शोभा मला चांगलीच आठवते आम्ही थोड्या दिवसात नवीन घरात राहायला आलो आणि आमचं एकमेकींशी संभाषण सुरु झाले तिला तीन मुली होत्या त्यातील खालच्या दोघी आणि माझ्या दोघी मुलींची चांगली मैत्री झाली शोभा मितभाषी तर मी चांगलीच बडबडी पण हळूहळू आमचे सुर जुळायला लागले आम्ही मॉर्निंग वॉकला सकाळी पाच वाजता जायला लागलो ऑफिसच्या लेडीज क्लब च्या महिन्यातून एकदा असणाऱ्या मिटींगला आम्ही एकत्र जायला लागलो तेथे वेगवेगळ्या स्पर्धा तंबोला कधी पिकनिक असे करमणुकीचे प्रोग्राम होत आम्ही लायब्ररी जॉईन केली दोघींनाही वाचनाची आवड होती मुलांच्या शाळा कॉलेज क्लासेस आमचे फिरणे यात दिवस निघून जाई आम्ही बारा वर्ष नेमाने मॉर्निंग वॉकला गेलो त्यात दिवसभराच्या गप्पा होत ते आमच्यासाठी टॉनिक असे शोभा गुड लिसनर होती तिने माझी अखंड बडबड तीस वर्ष आनंदाने सहन केली तिच्या शांत समजूतदार स्वभावाचे मला फार कौतुक वाटे तिची कधीही कशाचीही तक्रार नसे आहे त्याच परिस्थितीत समाधानी राहणे आनंदी राहणे तिचा स्वभाव होता घरात राहण्या वागण्यात व्यवस्थितपणा तर होताच पण कोणाही बद्दल मी कधीही तिच्याकडून वाईट ऐकले नाही मीच कधी कोणाबद्दल तक्रार केली तर मला समजवायची जाऊदे त्यांची पण काही बाजू असेल सुगरण तर ती आहेच आजही मी अचानक कधी तिच्याकडे गेले तरी उत्कृष्ट काहीतरी करून मला आग्रहाने खाऊ घालते मी तिच्याकडून बरेच काही शिकली माझ्या आई ला तिथे फार कौतुक होते नेहमी मला तिचे उदाहरण द्यायची माझे मिस्टर चार वर्ष साईटला बदलून गेले होते मला शोभाचा खूप आधार वाटायचा मी आईला सुद्धा काही गोष्टी सांगू शकायची नाही ते मी शोभाला सांगायची आम्ही तेथे न्यू इयर पार्टी कोजागिरीचे जागरण किंवा होळीला केलेली धमाल मुलांना अजून आठवते आमची दोघींची मुले खूप छान शिकली त्यांची लग्न केळवण आम्ही साग्रसंगीत केले शोभा माझ्यापेक्षा नऊ दहा वर्ष मोठी आहे पण आमच्या मैत्रीत त्याने काही फरक पडला नाही आमच्या स्वभावातील तफावतीमुळे सगळ्यांना आमच्या मैत्रीचे आश्चर्य वाटते पण गेली तीस वर्ष आमचा सुसंवाद झाला एकदाही मतभेद भांडणे झाली नाहीत काही वर्षांनंतर आम्ही घर बांधले पण मी टुव्हीलर चालवत असल्याने कधी आठवण आली तर तिला भेटायला जाते ती पण येते फोन कायमच सुरू असतो आता मुले बाहेर असल्यामुळे दोघीही मुलांकडे जात असतो पण परत आल्यावर एकमेकींच्या घरी जाणे सुरू होते आजही काही नवीन वाचले किंवा पुस्तक आणले की देवाण-घेवाण सुरू होते मुलींचे पण एकमेकींशी चांगले संबंध आहेत अशी प्रेमळ सौम्य व्यक्तिमत्त्वाची प्रेमळ मैत्रीण मला मिळाली याबद्दल मी स्वताला भाग्यवान समजते तिची फोनवरची हॅलो काय चाललंय ही हाक ऐकली की मला फार आनंद होतो माझ्या प्रत्येक पेंटिंग चे आणि शिवणकामाचे तिला फार कौतुक आहे ती मला नेहमीच प्रोत्साहित करते आमचीही छानशी मैत्री कायम अशीच रहावी अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करते

माझ्या नणंदेच्या लग्नाच्या रिसेप्शनमधे Bhel खापरखेड्याच्या लोकांना बोलविले होते. तिथे पहिल्यांदा मी स्मिता ला पाहीले, आफव्हाइट साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज मधली स्मिता मला अजून ही आठवते आणि तेव्हाच ती मला आवडली.पुढे तिच्याशी काही संबंध येईल असे वाटले नव्हते.तिचे यजमान आणि माझे यजमान एकाच कंपनीत बीएचआर मधे होते. दोघांनीही नागपूर ला flat घ्यायचे ठरवले आणि योगायोगाने एकाच अपार्टमेंट मध्ये flat बुक झाले. आम्ही शेजारी झालो. स्मिता माझ्या पेक्षा ९_१० वर्षांनी लहान आहे पण तिने मला ताई, वहिणि असे न म्हणता शोभा म्हणून हाक मारली आणि आमच्या वयांतील अंतर गळून पडले. आमच्या मैत्री ची सुरुवात झाली. दोघींचेही मिस्टर एका च कंपनीत, मुलेही शाळा, collegला जाणारी, त्यामुळे मोकळा वेळ आम्ही सोबत घालवू लागलो. Morning walk, library, छोटे मोठे क्लासेस हे सारे आम्ही सोबत केले.Bhel ladies clubच्या मिटिंगना आम्ही नियमितपणे जायचो. स्मिता पेंटिंग, शिवणकाम, स्वयंपाक उत्तम करते.लेडिज क्लब मधल्या स्पर्धा मधे तिचा नंबर ठरलेलाच असायचा. बक्षीस घेऊन च ती घरी यायची. माझ्या मुलींना तिचे फार कौतुक आहे.आमची मुलं अपार्टमेंट मध्ये कोजागिरी, न्युइअर , होळी असे उत्सव साजरे करायची. छान मजा यायची अजूनही ते दिवस आठवतात.आम्हा दोघींची हि मुले छान शिकली, त्यांची लग्ने झाली. दरम्यान स्मिता नवीन घरी राहायला गेली आणि मला वाटले आमची तुटते कि काय पण तसे झाले नाही.आमचा स्नेह कायम राहीला. ती गाडी चालवते आमच्या दुसऱ्या मैत्रीणी कडे जायचे असले की ती मला नेहमीच सोबत घेऊन जाते. मीही हक्काने तिच्या मागे आरामात बसून जाते. अगदी घरा पासून घरा पर्यंत. आता आम्ही ही घर बदलले त्यामुळे यापुढे ते शक्य होणार नाही.स्मिता फार बोलकी आहे त्यामुळे तिच्या खूप मैत्रिणी आहेत. समोरच्या व्यक्तीशी तिची पटकन मैत्री होते आणि ती ती निभावते आणि टिकवते.मी मितभाषी असल्याने मला मोजक्या च मैत्रीणी आहेत.आणि स्मिता त्यात अगदी खास आहे.ती म्हणजे हास्याचा, उत्साहाचा खळाळता झरा
उत्तर द्याहटवात्याच्या सान्निध्यात मन प्रसन्न होऊन जाते. अश्या या माझ्या मैत्रिणीचा सहवास मला नेहमी साठी लाभो
इती शोभा मेश्राम.