Sunanda


 दादांची बदली चंद्रपूरला झाली मी दहावी मॅट्रिक ला होते नवीन शाळा ती पण घरापासून लांब होती पण पहिल्याच दिवशी सुनंदा पोहेकर या वर्गातल्या मुलीशी ओळख झाली ती वर्गातील टॉपर होती ती पण सिविल लाइन्स माझ्या नवीन घराजवळ राहत होती आणि सायकल ने शाळेत येत होती त्यामुळे मला अनायासे सोबत मिळाली तिचे वडील डिप्टी कलेक्टर होते तिचे क्वार्टर माझ्या घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर होत मी घरात सर्व भावंडात मोठी होते तर नंदा घरातील शेंडेफळ दोघींकडे ही मोठा परिवार होता हळूहळू आम्ही एकमेकींकडे जायला लागलो ती स्वभावाने बिनधास्त मोकळी आणि हुशार अशी होती आमच्या दोघींचे वय पण असे होते की नवीन गोष्टींची ओळख होत होती आमची वाचनाची आवड हा एक कॉमन फॅक्टर होता शिवाय हिंदी गाणी आणि सिनेमा ही एक जमेचीआई बाजू होती हळूहळू आमची मैत्री बहरायला लागली दिवसभर शाळे निमित्त आम्ही एकत्र असायचो तर शाळेनंतर पुन्हा भेटून गप्पां आणि फिरण्याचा कार्यक्रम असायचा आमची जोडी शाळेत हुशार म्हणून प्रसिद्ध झाली प्रमोद नवलकर ची भ्रमंती आणि देवयानी चौबळ हिचे लेख वाचणे हा आमचा आवडता टाइमपास होता हिंदी गाण्यांची डायरी आम्हा दोघींकडे होती त्यात जवळपास 300 गाणी सुंदर अक्षरात आम्ही लिहिली होती आम्ही एकसारखे कपडे शिवत होतो त्यात काढलेला स्टुडिओ तील फोटो माझ्याकडे बरेच वर्षे होता ती हक्काने माझ्या घरी येऊन काकू आज काय नवीन केलंय असा माझ्या आईला विचारीत असे मी पण तिच्या घरी गेली की तिची आई मला प्रेमाने जेऊ घालत असे असे आमचे दिवस आनंदाने जात होते वार्षिक परीक्षा संपल्या-संपल्या दिवशी आम्ही बॉबी हा चित्रपट पाहिला आणि हॉटेलिंग करून घरी आलो होतो पण नित्याप्रमाणे आमची बदली झाल्याने आमचा सहवास संपुष्टात आला दोघींनाही फार वाईट वाटले पण पत्रव्यवहार सुरू राहिला काय ऋणानुबंध असेल त्यानुसार त्यामुळे आम्ही कॉलेज जीवनातील एक वर्ष अकोल्याला एकत्र होतो त्यानंतर नंदा नोकरीनिमित्त मुंबईत स्थिरावली माझे लग्न होऊन मी तमिळनाडूत गेले आठ वर्षानंतर मी नागपूरला माझ्या यजमानांच्या नोकरीनिमित्त बदलून आलो तेव्हा नंदा अचानक मला भेटायला आली खूप आनंद झाला तिने स्टेट बँक जॉईन केली होती त्यांचे राहते घर नागपुरातच होते ती आईजवळ राहु लागली आम्ही एकमेकींना भेटू लागलो माझ्या मुलांचे तिने भरपूर लाड केलेत त्यांची ती लाडकी मावशी झाली मनासारखा जोडीदार न मिळाल्याने तिने विवाह केला नाही ती स्पष्टवक्ती महत्वाकांक्षी आणि परखड मत असलेली होती स्वतंत्र मनोवृत्तीची असल्याने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता ती एकटी राहत होती येथील नोकरीत तिचे मन लागले नाही आणि ती कॅनडाला शिफ्ट झाली पुढे दुबईत गेली आपल्या कामामुळे तिने खूप प्रगती केली आणि वरच्या पदावर तेथे काम केले मला तिचा अभिमान वाटतो तिने आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगले सगळ्या जगाची सफर केली बरे वाईट अनुभव घेतले एकटीने यशस्वीपणे साऱ्याला सामोरी गेली आमचा फोन नाही फोन मुळे संपर्क होता दर दोन-तीन वर्षाआड भेट होत होती त्यामुळे प्रेम कायम राहिले आता आमच्या मैत्रीला 45 वर्ष झालीत त्या लहानपणच्या एक वर्षाच्या मैत्रीचे रूपांतर आता नवीन समजूतदार आणि परिपक्व संबंधात झाले आमचे बरेचदा मतभेद झाले आणि होतात पण आम्ही एकमेकींना समजून घेतो आणि पुढे जातो ती आता रिटायरमेंट नंतर पुण्याला स्थायिक झाली दोन वर्षांपूर्वी तिला दुर्धर अशा दुखण्याने गाठले पण तिच्या हिमतीने आणि धैर्याने तिने त्याचा सामना करून त्याला हरविले ती बॉर्न फायटर आहे आता दर चार-पाच दिवसांनी आम्ही बोलतो खुप हास्यविनोद करतो तो वेळ आमच्यासाठी निवांत आणि टेन्शन फ्री असतो साध्या गप्पा असतात पण ते आमच्या जगण्याचे टॉनिक आहे ही आमची मैत्री अशीच कायम राहो आणि तिच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

स्पर्श

ऋणानुबंध