Pallavi

पल्लवी
प्रिय पल्लवी ,
आज तुला 43 वर्ष पूर्ण होऊन 44 साव वर्ष सुरू झाले वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आज विचार केला तर विश्वासच बसत नाही तुझा जन्म झाला तेव्हा मी एकोणीस वर्षाचे होते लग्नानंतर एक वर्षात तुझा जन्म झाला आम्ही त्रिची ला राहात असल्याने प्रेग्नेंसी मध्ये बराच प्रवास झाला . रोज क्लबमध्ये जाणे गप्पा, बाईक वर फिरायला जाणे मी बिनधास्त केले नागपूरला आल्यावर पण आईकडे खूप एन्जॉय केले तू व्हायच्या आदल्या संध्याकाळी सीमा बरोबर पाणीपुरी खाऊन आले होते रात्री ऍडमिट होऊन सकाळी सात वाजता तू अगदी त्रास न देता नॉर्मल डिलिव्हरी होऊन आमच्या आयुष्यात आलीस मी रूम मध्ये आले तेव्हा आईने शिवलेल्या ब्ल्यू बॉबी प्रिंटच्या फ्रॉक मध्ये तुला दुपट्यात लपेटून ठेवले होते चांगले मोठ्या डोळ्यांनी तू आमच्याकडे बघत होतीस मला चांगले आठवते. खूप गोड बाळ झाल्याने सर्वजण खुश होते. आता मी एकोणीस वर्षाच्या मुली कडे पाहिले की मला आश्चर्य वाटते की आपल्याला काही कळायच्या आतच आपण आई झालो होतो
आम्ही दोघे पण खूप खुश होतो तुला घेऊन त्रिची ला आलो लहान वय बरोबर सासुबाई मोठे कोणी नाही आई पण खूप लांब असल्याने जमेल तसे सांभाळले तू पण खूप शांत आणि म शहाण बाळ होतीस रोज तुला घेऊन क्लब मध्ये जायचो तेथे छान खेळायची सगळ्यांजवळ जायची यांचे बॅचलर मित्र शेवटी माझ्याजवळ द्यायचे आणि म्हणायचे अरे ही रडतच नाही पण आम्ही फिरून फिरून थकलो कधीही जेवण खाणे पिणे यावर त्रास दिला नाहीस आनंदी बाळ होतीस . गोल्डन कुरळ्या केसांनी खुप छान दिसायचीस बेबी शोमध्ये फर्स्ट प्राईज मिळवलेस
आजोळी पण दोन्हीकडे खूप लाडकी होतीस नर्सरीच्या पहिल्या दिवशी पप्पा बाहेर बसले होते रडत होतीस पण त्यानंतर मात्र आनंदाने सायकल रिक्षाने शाळेत जायचीस
मी घरीच तुला नवीन नवीन फ्रॉक शिवायची तुझ्या गॅदरिंग साठी आजीच्या गुलाबी साडी चा मी तुला रात्री बसून गाऊन शिवून दिला होता त्याचा फोटो आपल्याकडे बरेच वर्ष होता फोटो काढायची तुला लहानपणापासून फार आवड ती अजूनही कायम आहे
तू श्रीकांत मधुरा ची ताई झालीस त्यांना खूप छान सांभाळतेस तुमचे फार भांडण झालेले मला आठवत नाही नागपूरचे तुमचे शाळा कॉलेजचे वर्ष फार पटकन आणि बिझी गेलेत तू अभ्यासात हुशार होतीस खूप अभ्यास केला नाही पण एक पाठी असल्याने छान पास व्हायचीस. इंजिनीयर झालीस तुला कायमच खूप मित्र-मैत्रिणी असायच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या सगळ्या गप्पा माझ्या आणि मधुरा शी करायचीस तुझा वाढदिवस म्हणजे आपल्याकडे एक सोहळाच असायचा मित्र-मैत्रिणी मोठे कडील सगळेजण यायचे छान पार्टी व्हायची घरीच केक करण्यात यायचा मजा यायची तू आणि मधुरा घरात खूप मस्ती करायच्या गाणी लावून डान्स व्हायचा, खूप हास्यविनोद व्हायचं ते दिवस मी खूप मिस करते पप्पा सुरतला गेल्यावर राहणे मला तुम्हा मुलांमुळे सुसह्य झाले श्रीकांतला तुम्ही दोघींनी खूप काळजीपूर्वक सांभाळले तुमचे पाहून तो पण अभ्यास करायला लागला
लहानपणापासून व्यवस्थितपणा आणि आवर शक्ती तुझ्यात आहेच रोज घरी आल्यावर हॉल आवरायचे काम तू आधी करायची सकाळी पण मला मदत करून जायचीस छान तयार होऊन कॉलेजला जाणे तुला आवडायचे मी आणि मधुरा तू छान दिसतेस हे रोज तुला सांगितल्या शिवाय तू जायची नाहीस चांगले कपडे घालायची खूप आवड होती. आताही आहेस तुला नोकरी लागल्यानंतर आपण खूप शॉपिंग करायचो. वर्षभर खूप फिरलो .
तुझे लग्न ठरल्यावर तू दिल्लीला जाणार इतक्या दूर याचे वाईट वाटत होते. सुधीर सारखा चांगला जावई मिळाला याचा आनंद होता. मला आठवते तुझं लग्न लागत असताना मला आतल्या खोलीत बसवले होते माझ्या पोटात करवतीने कोणी कापताहे अशा वेदना होत्या. आपल्या शरीराचा एखादा भाग कापून देताना जो त्रास होतो तो मी अनुभवला. नाळेचे नाते म्हणजे काय हे मला तेव्हा कळले.
आता तू आई झालीस. दिया इशा सारख्या गोड नाती तुमच्यामुळे आम्हाला मिळाल्या, त्याचा फार आनंद आहे. तू सुधीरची चांगली मैत्रीण, चांगली बायको झालीस. सासू-सासर्‍यांची चांगली सून, मुलींची चांगली आई झालीस याचे कौतुक आहे.

लव मॅरेज मुळे परक्या कल्चरमध्ये जाऊन तेथे ऍडजेस्ट होताना झालेल्या त्रासाची आम्हाला कधी तक्रार केली नाहीस सगळ्या तडजोडी करत चांगली गृहिणी बनून सगळे घर सांभाळून घेतलेस तेथेदेखील आपल्या वागण्याने चांगल्या स्वभावाने खूप मित्र-मैत्रिणी जोडल्यास त्या पण जिवाभावाच्या त्यांच्या चालीरीती सणवार आपलेसे केलेस . मधुरा श्रीकांतची ताई म्हणून त्यांचे खूप लाड करतेस प्रसंगी त्यांना चांगले सल्ले देतेस याचे आम्हाला कौतुक आहे आतादेखील पुण्यात आल्यावर काका काकू चुलत भावंडे मावस भावंडे सगळ्यांना भेटतेस त्यांना घरी बोलावते सुधीर ला .पण याची फार आवड आहे आम्हा दोघांची पण काळजी करतेस आपण रोजच फोनवरून संपर्कात असतो तुला फिरण्याची, चांगलं राहण्याची, लोकांना पदार्थ करून खाऊ घालण्याची फार आवड आहे. त्याने तू पुण्यात देखील प्रेमाच्या मैत्रिणी जोडल्यास. आई म्हणून देखील तू मुलींसाठी खूप कष्ट करतेस, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत जागरूक असतेस, त्यांची मैत्रीण पण आहेस. तू कायम अशीच रहा, आनंदी राहा. आज माझा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी शुभ आशीर्वाद 

आई 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

स्पर्श

ऋणानुबंध