Shrikant

प्रिय श्रीकांत आज तुझा वाढदिवस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो भविष्यात देखील तुला जे जे हवे असेल ते भरभरून मिळो हीच सदिच्छा
तुझा जन्म हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा छान होता कारण त्याआधी काही दुःखद घटनेमुळे मन उदास होते तुझ्या आगमनाने आणि गोंडस रूपाने तू आम्हा सगळ्यांना खूप आनंद दिला मोठी आई पल्लवी मधुरा सगळे मामा सगळे खुश होते तुला वाढवणे मी खूप एन्जॉय केले मला ते कधी कठीण वाटले नाही कारण तू शांत आणि आनंदी बाळ होतास सारखा पल्लवी मधुरा च्या मागे खेळत असे सगळ्यांचा लाडका होता नंतर देखील कधी तू काही हट्ट केल्याचे मला आठवत नाही
तुम्ही तिघेही भावंडे शहाणी व समजूतदार होती आम्ही आमच्या परीने तुम्हाला चांगले वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्याला तुम्ही यश आणि बळ दिले हुशार पण निघालेत चांगली शिकलेत त्याबाबतीत आम्ही भाग्यवानच आहे त्यामुळे मी तुला कधी अभ्यास कर असे म्हंटले नाही तूच मिस्कीलपणे मोठा झाल्यावर म्हणायचा कशी आई आहेस कधीच अभ्यासासाठी रागवत नाहीस मुली तर मला नेहमी म्हणतात श्रीकांत तुझा जास्त लाडका आहे खरेच आहे तू लहान असल्याने आणि माझ्याजवळ जास्त राहिल्याने माझा तुझ्यात खूप जीव आहे तू मितभाषी आहेस खूप भरभरून बोलत नाहीस पण तुझा आवाज ऐकला तरी माझा दिवस छान जातो मला नेहमी वाटते तुला काही त्रास झाला किंवा वाईट वाटले तरी तू कधी सांगणार नाही त्यामुळे मला तुझी जास्त काळजी वाटते
आपण त्रिची ला असताना मद्रास हुन तू सुट्टीला यायचास तो काळ मी खूप मिस करते आपण शॉपिंग फिरायला जाणे त्या मोठ्या घरात राहणे वेगळ्याच वातावरणात ते दिवस गेलेत तुला मुंबईला पाठवायचं होतं म्हणून आम्ही तुला सेलम स्टेशन वर सोडायला गेलो होतो तुझी प्लॅटफॉर्मवरील एकटा बसलेली मूर्ती मला आजही आठवली की डोळ्यात पाणी येते तेव्हा कितीतरी दिवस मी ते आठवून रडत असे
मुलीं प्रमाणे मुलांनाही आज-काल नोकरीच्या गावी जावे लागते आणि आई-वडिलांना तो विरह सहन करावा लागतो तू परदेशी जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेच मी चार-पाच दिवस झोपले नाही येथे निदान आठवण आल्यास दोन तासात भेटू शकतो या आशेवर मी असते
मद्रासला राहत असताना तेथील महाराष्ट्र मंडळात नाश्ता जेवणाचे हाल झाले तरी तू कधी तक्रार केली नाहीस पुरेसे पैसे असले तरी त्याचा कधी गैरवापर केला नाही मुंबई देखील खूप काळजीपूर्वक खर्च करायचा उत्तम रीतीने सीए एमबीए यशस्वीरित्या पास झालास मला त्याचा फार अभिमान आहे
नंतर कधीतरी मद्रासच्या महाराष्ट्र मंडळात आम्ही राहिलो असता तेथील नाश्ता जेवण याची निकृष्ट व्यवस्था पाहून मी तेथील फडके बाईशी भांडून आले होते तिला म्हटले आम्ही आमच्या लाडक्या मुलाला तुमच्या इथे मराठी जेवण मिळेल त्याची चांगली सोय होईल म्हणून ठेवले काय तुमची हि व्यवस्था पाहून मला माझ्या मुलासाठी फार वाईट वाटतं त्याने शब्दानेही कधी तक्रार केली नाही ती बाई माफी मागू लागली असो तू मुंबईत असताना मी तुझ्याजवळ येऊन राहत असे तो काळ माझ्यासाठी गोल्डन प
पिरेड होता वेळ मिळाला की तू मला पहाटे अगदी रात्री सुद्धा समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जायचा लोकलमधून दुपारच्या वेळेला फिरवून आणलेस आपण केदार मधुरा बरोबर मॉर्निंग शोचे अनेक सिनेमे पाहिले
भविष्यात तुझ्याबरोबर सुखाने राहायचे आहे हे माझे स्वप्न आहे ठाकूर ते निश्चितच पूर्ण करतील आता तू मोठा होतोय तुला देखील बाळ झाले तू आमची सपोर्ट सिस्टीम आहे पल्लवी मधुराचा प्रिय भाऊ आहेस त्यांच्या मदतीला नेहमी तयार असतोस तुम्ही तिघेही कायमच एकमेकांच्या प्रेम बंधनात असावे अशी माझी इच्छा असते तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी हे मनोगत व्यक्त केले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी हे पत्र संपवते
तुझी आई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरुणा

स्पर्श

ऋणानुबंध